पुणे - कोणत्याही विषयाबाबत विचारले तर महाविकास आघाडीतील नेते 'ही केंद्राची जबाबदारी आहे', असे सांगतात त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायला केंद्राला पत्र पाठवतील, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या आमदार निधीतून पुणे महापालिकेला वैदयकीय साहित्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
'शरद पवारांची भेट फक्त प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी' -
काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना. 'ही राजकीय भेट नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले. पवारांची आत्ताची परिस्थिती पाहता कोणीही त्यांच्याशी राजकीत चर्चा करायचे धाडस करणास नाही, असेही ते म्हणाले.
'ओबीसी आरक्षणातचा केंद्र सरकारशी काहीही संंबंध नाही' -
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संंस्थेतील ओबीसीचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याबाबतीतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणातबाबत केंद्र सरकारचा काहीही रोल नाही. राज्याचा इंपेरिकल डाटा द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने 2010 सालीच सांगितले आहे. तसेच गेल्या दीड वर्षापासून राज्यात मागासवर्गीय आयोग स्थापन झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीला केली मारहाण