ETV Bharat / state

'महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढणार आहात की नाही?' - चंद्रकांत पाटील महिला अत्याचार निदर्शने

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला व मुली अत्याचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आज राज्यभर भाजपाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil
author img

By

Published : Oct 12, 2020, 3:38 PM IST

पुणे - हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेधच करतो. मात्र, तेथील मुख्यमंत्र्यांनी आरोपींना अटक केली, सीबीआय चौकशीही लावली. पण, महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचारांचे काय? येथे घडणाऱ्या घटनांसाठी कॅन्डल मार्च, मशाल मोर्चा काढणार आहात की नाही? उद्धव सरकारने आता तरी जागे व्हावे, त्यांना महिलांचा आक्रोश ऐकू येत नाही का? सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे झाला आहात का? तुमची संवेदनशीलता संपली आहे का? अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने राज्यभरात निदर्शने केली जात आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार दिलीप कांबळे, भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. प्रामुख्याने लहान आणि गतिमंद मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. कोरोनावर उपचार घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये गेलेल्या महिलांवरही अत्याचार होत आहेत. कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या विनयभंगाच्या आणि बलात्कारांच्या घटनांची यादी मोठी होत आहे. कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी भाजपाच्या महिला मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या पोलीस प्रमुखांना भेटून निवेदनही दिले आहे. त्याबाबत अद्यापही कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबईत सकाळपासून विस्कळीत झालेल्या वीजपुरवठ्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ही घटना अनपेक्षित आणि खूप वर्षांनी घडली आहे. सरकारने या प्रकरणी तातडीने धावपळ सुरू केली असेलच. अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये जी गती पाहिजे ती सरकारने दाखवली पाहिजे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा सुरू आहेत. त्याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या पक्षामध्ये वाढलो त्या पक्षाचे नुकसान मी कधीच करणार नाही, हे नाथाभाऊंनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरीही त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल वावड्या उठवल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.