पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलन जमावबंदीचा आदेश जुगारून विद्यापीठात मोठा राडा घातला होता. मीटिंग हॉलमध्ये घुसून त्या ठिकाणी तोडफोड केली होती. काचा फोडल्या होत्या. आता या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आठ प्रमुख पदाधिकारी तसेच इतर वीस ते पंचवीस जनाविरोधात पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिसांकडे देण्यात आलेला आहे.
'या' विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल : सुधीर सोपान दळवी वय ५० वर्षे धंदा- नोकरी. रा. एन / ३०३, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी या विद्यार्थ्यांना विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर चतुशृंगीपोलीस स्टेशनकडून (१) रंगा महादेव २) अनिल ठोंबरे ३) आंबादास अभिनवे ४) शुभंकर बाचाल ५)अमोल देशपांडे ६) अंकिता पवार ७) मित ठक्कर ८) पवन पिनाटे व त्यांच्यासोबत अनोळखी १५ ते २० विद्यार्थी निरंक दाखल करण्यात आला आहे.
घोषणाबाजी करुन गोंधळ : परवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवुन मिटींग हॉलमध्ये बेकायदेशीर जमले. तेथे हजर असलेले एमएसएफचे कर्मचारी व फिर्यादी यांनी विरोध करीत असताना, त्यांनी एमएसएफ कर्मचारी यांना बाजुला करुन दरवाजाला धक्के मारुन, दरवाजाची काच फोडुन, धक्यामुळे दरवाजा उघडल्याने मिटींग हॉलमध्ये अनाधिकराने घुसले. तेथे मिटींग टेबलवर असलेले पेपर फाडुन नुकसान केले. घोषणाबाजी करुन आरडाओरड करुन गोंधळ घातला. जमावबंदी आदेश लागू असताना आदेशाचा भंग केला म्हणुन वरील आरोपींविरुध्द कायदेशीर तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलन करताना विद्यार्थ्यांची वर्तणूक चुकीची : विद्यार्थ्यांनी आपल्या मागणीसाठी आंदोलन करणे, हा त्यांचा अधिकार आहे. विद्यापीठामध्ये चुकीच्या पद्धतीने रॅप सॉंग रेकॉर्ड केले गेले. या विरोधात आंदोलन करताना विद्यार्थ्यांची वर्तणूक सुद्धा चुकीची झाली. जबरदस्तीने घुसणे, राडा घालणे हे विद्यापीठाला बेकायदेशीर वाटले. म्हणून त्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.