पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार ( Offensive Posts against Ajit Pawar ) यांच्या विरोधात फेसबूकवर ( Facebook ) बदनामीकारक लिखाण केल्याबद्दल नितीन संजय यादव ( रा. करंजेपुल, ता. बारामती, जि.पुणे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी फेसबूक अकाउंट धारकासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
'केंद्र सरकारने द काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त करावा - अजित पवार', अशा आशयाची पोस्ट दिनांक 16 व 17 मार्च रोजी फेसबूकवर प्रसारीत करण्यात आली होती. ही पोस्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार अजित पवार यांना अब्रुनुकसान कारक असल्याची तक्रार देण्यात आली आहे. तसेच त्या पोस्टखाली अश्लील, अक्षेपार्ह व बदनामीकारक शिवीगाळ करणाऱ्या कमेंट सार्वजनिक माध्यमावर करण्यात आल्यानेही अजित पवार यांची बदनामी झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - MPSC Result : सेंट्रींग व गॅरेजमध्ये काम करणाऱ्यांची मुले झाली पीएसआय