ETV Bharat / state

आमदार अनिल भोसले, नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल

आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी भाजप नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह 16 जणांवर 71 कोटी 68 लाखांच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:06 AM IST

पुणे - आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी भाजप नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह 16 जणांवर, शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बँकेतील पैसे त्यांनी संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट नोंदींच्या आधारे स्वतःसाठी वापरले आणि त्यामुळे बँकेचे 71 कोटी 68 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम

बँकेत जमा झालेले ठेवीदारांचे पैसे खोट्या नोंदी करून परस्पर वापरल्याचे रिझर्व्ह बँकेने केलेल्या लेखापरीक्षणात उघड झाले. त्यानंतर ठेवीदाराने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ यापूर्वीच बरखास्त करण्यात आले असून रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर प्रशासक नेमलेले आहेत. बँकेत हजारो ठेवीदारांचे जवळपास 300 कोटी रुपये अडकले आहेत. अनिल भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले असले तरी 3 वर्षांपासून त्यांचा भाजपशी घरोबा आहे.

Intro:आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अपहार प्रकरणBody:mh_pun_04_shivajirao_bhosle_bank_action_avb_7201348

ancho
पुण्यातील आमदार अनिल भोसलें आणि त्यांच्या पत्नी भाजप नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह १६ जणांवर, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बॅंकेतील पैसे त्यांनी संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट नोंदींच्या आधारे स्वतसाठी वापरले आणि त्यामुळे बॅंकेचे ७१ कोटी ७८ लाख रुपये रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे. बॅंकेत जमा झालेले ठेवीदारांचे पैसे खोट्या नोंदी करुन परस्पर वापरल्याच रिझर्व्ह बँकेने केलेल्या लेखापरीक्षणात उघड झाले.त्यानंतर ठेवीदाराने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ यापूर्वीच बरखास्त करण्यात आलेले असून रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर
प्रशासकाच नेमलेले आहेत. बॅंकेत हजारो ठेवीदारांचे जवळपास तीनशे कोटी रुपये अडकले आहेत. अनिल भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले असले तरी तीन वर्षांपासून त्यांचा भाजपशी घरोबा आहे.
Byte संभाजी कदम, डीसीपीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.