ETV Bharat / state

भिमाशंकर-भोरगिरी परिसरात 'डोंगरची काळी मैना'चे आगमन; आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी - भिमाशंकर

भिमाशंकराच्या डोंगर रानात राहणारे आदिवासी बांधव दिवसभर हे करवंद तोडत असतात. त्यानंतर आपल्या लहान-लहान मुलांच्या साहाय्याने या करवंदाची विक्री करतात.

करवंद
author img

By

Published : Jun 1, 2019, 12:50 PM IST

Updated : Jun 1, 2019, 2:53 PM IST

पुणे - खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये विसावलेल्या भिमाशंकर अभयारण्यातील भोरगिरी परिसर 'डोंगरची काळी मैना' म्हणजेच करवंदानी सजलेला आहे. या करवंदांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत.

भिमाशंकर-भोरगिरी परिसरात 'डोंगरची काळी मैना'चे आगमन; पाहा विशेष रिपोर्ट

भर उन्हाळ्यातदेखील भोरगिरी भिमाशंकर परिसर हिरवागार दिसत असतो. या काळामध्ये नजर जाईल तिकडे करवंदांनी सजलेली झाडे बघायला मिळतात. डोंगर रानात राहणारे आदिवासी बांधव दिवसभर हे करवंद तोडत असतात. त्यानंतर आपल्या लहान-लहान मुलांच्या साहाय्याने या करवंदाची विक्री करतात. पर्यटकही मोठ्या आवडीने हे करवंद विकत घेतात.

आदिवासींनी करवंदांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले.

करवंद हे काळ्या रंगाचे फळ आरोग्यावर्धक असते. त्यामुळे डॉक्टरही करवंद खाण्याचा सल्ला देत असतात. करवंदाला हिंदीमध्ये 'खट्टा मीठा' या नावाने, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. विशेष राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाने कहर केला आहे. मात्र, या दुष्काळाच्या झळा करवंदाला बसलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा करवंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याचे येथील आदिवासी सांगतात.

Intro:Anc-खेड तालुक्यातील सह्याद्री च्या पर्वत रांगा भिमाशंकर अभयारण्यात भिमाशंकर भोरगिरी परिसर आता "डोंगरची काळी मैना" करवंदांनी जणु सजलाच आहे डोंगर रानात आदिवासी लोक आपल्या पोटासाठी उन्हात दिवसभर फिरुन करवंदाची तोडणी करतात आपली मुले व स्वत दिवसभर रस्त्यावर करवंदाची विक्री करतात याच करवंदाचा स्वाद पर्यटक मोठ्या आनंदाने घेत आहे चला तर मग आपणही जाऊया डोंगरच्या काळ्या मैनाच्या भेटीला 

Vo--उन्हाळ्यातही  हिरवागार दिसणारा हा भोरगिरी भिमाशंकर परिसर या परिसरात जिकडे नजर जाईल तिकडे डोंगरची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणा-या करवंदांच्या झाळ्या पहायला मिळतात,उन्हाळ्यात  आपल्याला गारवा देणार्‍या डोंगरची  काळी मैना आता खायला तयार झाल्या असुन करवंदानी भरभरुन पहायला मिळत आहे या दुष्काळाचा परिणाम मात्र करवंदे उत्पादनावर झालेला दिसत नाही

 Vo-डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळ्या लहान आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त असुन सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा.  हे करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.

Byte-आयाज तांबोळी - स्थानिक नागरिक

Byte-एकनाथ सांडभोर - पर्यटक

Vo-वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना अशा उष्म्यात मनाला गारवा देणारी करवंदं खाण्याची संधी मिळते ती भिमाशंकरच्या सह्याद्री डोंगररांगेत,थंडगार असलेली करवंदं खायला मस्त असून ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो.या करंवंदाचा स्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत करवंदं हे बेरी वर्गीय फळ असून त्याचा आरोग्य राखण्यासाठीही उपयोग होतो. 

PTC- रोहिदास गाडगे- प्रतिनिधी

End vo-यंदाच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थितीची झळ असताना भिमाशंकरच्या अभायारण्यात मात्र करवंदाची झाडे मात्र उन्हाच्या चटक्यांतही हिरवी गार करवंदाने भरलेली पहायला मिळत आहे याच करवंदाचा अस्वाद घेण्यासाठी पर्यटक ही आवर्जुन या ठिकाणीं येतातच व तुम्हीही या.....डोंगरच्या काळी मैना चा स्वाद घ्याBody:....Conclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.