ETV Bharat / state

हृदयद्रावक घटना; कोरोना संसर्गाने बाप-लेकाचा मृत्यू - corona news

आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथील, एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. कोरोनाने घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने थोरात कुटुंबीय पोरके झाले आहे.

कोरोना संसर्गाने बाप-लेकाचा मृत्यू
कोरोना संसर्गाने बाप-लेकाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 8, 2021, 9:57 AM IST

आंबेगाव (पुणे) करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अनेकांचे कुटुंब उद्वस्त केले आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असली तरीही धोका अजून टळला नाही. या महासाथीने अनेकांचे नातलग हिरावले. एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे.अशा अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथेही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. कोरोना संसर्गाने बाप व लेकाचा काही तासाच्या फरकाने मृत्यू झाला आहे. घरातील दोन्हीही कर्ते पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.

करोनामुळे बाप-लेकाचा मृत्यू

बाप-लेकाचा मृत्यू
बाप-लेकाचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथील, नारायण गंगाराम थोरात (वय-65) व रवींद्र नारायण थोरात (वय-38) अशी कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या बाप व लेकाची नावे आहेत. मुलगा रवींद्र थोरात यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना भोसरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रवींद्र यांच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांनाही पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना 4 जून रोजी अचानक रवींद्र यांची ऑक्सिजन पातळी खालावली. त्यामुळे काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा शोकही संपला नव्हता, तोपर्यंत कोरोना विषाणूने काही तासातच वडील नारायण थोरात यांचाही मृत्यू झाला. कोरोनाने घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने थोरात कुटुंबीय पोरके झाले आहे.

हेही वाचा- बीडमध्ये कोरोनाला उतरती कळा, मृत्यू दर घटला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.