पुणे : हडपसर परिसरातील महादेवनगर येथील दुकानदार रमेश बराई यांना रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या कर्मचार्यांनी तुफान मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासमोर ही फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. यामध्ये रमेश बराई यांना टोईंग कर्मचाऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. यासंदर्भात बराई यांनी तक्रार दिली असून या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवीगाळी करत मारहाण केली : रमेश बराई यांचे महादेवनगर परिसरात फुटवेअरचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर दुचाकी खालीपडून पेट्रोल गळत होते. पेट्रोल कुठून गळ्यात आहे याची तपासणी करत गाडी पाहत एक महिला पोलीस वाहतूक कर्मचारी आणि टोईंग व्हॅन कर्मचारी त्या ठिकाणी खाली उतरले. त्यातील एका जणाने रमेश बराई आणि गाडी पाहत होते ते व्यक्ती यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना शिवीगाळी करत मारहाण करण्यास सुरूवात केली. कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने बराई यांना देखील राग अनावर झाला आणि त्यांनी थेट हातात एक वीट घेऊन कर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली.
पुण्यातली कायदा सुव्यवस्था आणि अधिकाऱ्यांची दहशत : सदर घटना घडत असताना तेव्हा एक महिला पोलीस कर्मचारी देखील तेथे उपस्थित होत्या. त्यांच्या समोर बराई वीट घेऊन धावून आले. त्यामुळे तरुण कर्मचारी मुलांनी बराई यांना कपडे फाटेपर्यंत तुफान मारहाण केली. हा सगळा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रीत झाला त्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला असून पुणेकरांना मात्र आता गुंडा पेक्षा जास्त या वाहन उचलणाऱ्या लोकांची आणि पोलीस कर्मचाऱ्यांची भीती वाटत आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये कायद्याचे राज्य असे आहे का नाही याची सुद्धा आता चर्चा होत आहे. एखादा कर्मचारी जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यासमोरच खुलेआम एखाद्या सामान्य नागरिकांना मारत असेल तर पुण्यातली कायदा सुव्यवस्था आणि अधिकाऱ्यांची दहशत याला कोण कार्यवाही करणार हा प्रश्न आता विचारला जात आहे.
हेही वाचा : Nashik News: ट्रकमधून बकऱ्या फेकण्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 'त्या' अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल