पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये दिराने वहिनीवर बलात्कार करण्यास मित्राला सहकार्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच स्वतः बळजबरी करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यास वहिनीने नकार देत प्रतिकार केल्याने दिराने वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बलात्कार करणारा आरोपी अक्षय कारंडे हा फरार असून, दिराला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
- हेही वाचा - चेन्नई येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी केली सुखरुप सुटका
- दिराच्या मदतीने वहिनीवर मित्राचा बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मृत महिला ही दिराकडे काही कारणामुळे राहात होती. रविवारी ती दिरासह जवळील एका डोंगरावर आली. दरम्यान, मित्र अक्षयने आरोपी दिराला फोन करून आपण पुण्यातील बुधवार पेठेत जाऊ असे म्हटले. त्यावर आरोपी दिराने मीच तुझी इच्छा पूर्ण करतो. तू डोंगरावर ये असे सांगितले. वहिनी आणि आरोपी दिर हे दोघे त्या डोंगरावर पोहचले. तिथे पाठीमागून आलेल्या अक्षयने बळजबरी करत विवाहित महिलेला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तर, दिराने देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, त्यास वहिनीने प्रतिकार केला.
- दिराने वहिनीचा गळा आवळून केला खून -
याचाच राग मनात धरून आरोपी दिराने वहिनीचा गळा आवळून खून केला. तसेच मृतदेह ओळखण्यास येऊ नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला होता. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. आरोपी दिराला पोलिसांनी अटक केली असून, बलात्कार करणारा आरोपी अक्षय मात्र फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - कान्हेगावमध्ये शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू