पुणे - पिंपरी-चिंचवडमधील वेताळ वस्तीत बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन संबंधित वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी केले. भंगार विक्रेत्यांनी लोखंडी वस्तू आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी पोलिसांना यासंदर्भात फोन आला; त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, चार लोखंडाच्या बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निदर्शनास आले असून ते रस्त्याच्या कडेला सापडले आहे. मात्र, यापासून कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - एजीआर शुल्क : एअरटेलने दूरसंचार विभागाला दिले ८,००४ कोटी रुपये