लोणावळा (पुणे) Block On Pune Mumbai Expressway: 'आयटीएमएस' अंतर्गत 'ओव्हरहेड गॅन्ट्री' बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी सोमटने फाटा जवळ ही 'गॅन्ट्री' बसविण्यात येणार (grantee installation work) आहे. गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जात आहेत. तसेच पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या दरम्यान प्रवाश्यांनी सहकार्य करावं असं आवाहन 'एमएसआरडीसी' आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.
प्रवाशांना सहकार्याचं आवाहन: गेल्या महिनाभरात अनेकदा 'ग्रँटी' बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. मुंबई-पुणेला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग हा महत्त्वाचा आहे. या मार्गावरून लाखोच्या संख्येने अनेक नागरिक प्रवास करतात. मुंबई ते पुणे दररोज अनेक नागरिक प्रवास या मार्गावरून करतात. या रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये-जा करत असतात. उद्या दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे असे आवाहन देखील केले गेले आहे.
सर्वच वाहनांची वाहतूक असणार बंद: उद्याचा ब्लॉक हा सोमाटणे फाटा येथे घेण्यात येणार असल्याने पुण्याकडील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हा ब्लॉक दोन तासांचा असणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
कशी वळवणार वाहतूक?
1) मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) वाहिनीवर कि.मी. ५४.४०० वरून एन. एच. ४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतुक वळविण्यात येतील.
2) मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेनने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. ४ जुना मुंबई-पुणे महामार्ग या रस्त्याने पुढे पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येतील.
हेही वाचा: