पुणे - चाकण उद्योगनगरीत चाकण-तळेगाव मार्गावर रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत असून वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.
रात्रीच्या सुमाराम खालुम्ब्रे गावाजवळ चाकण-तळेगाव मार्गावर वडाचे झाड पडल्याची घटना घडली होती. तेव्हापासून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी काही वेळासाठी वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, यानंतर पुन्हा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा कामगारांबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. चाकण तळेगाव मार्गावरील वाहतूक कोंडी काढण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे.