पुणे BJP Protest In Pune University : या आंदोलनावेळी भाजपा कार्यकर्त्याने काही संघटनाच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यापीठाच्याच एका ठिकाणी या संघटना सभासद नोंदणी करत होत्या. त्यानंतर मात्र हे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झाले. पोलिसांनी प्रचंड कसरत करत हे सगळं आंदोलन थांबवलं; पण हे पोलिसांचं अपयश असल्याचं या कार्यकर्त्याने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असताना मारहाण केली जाते, गुलामासारखं वागवलं जातं. या विरोधात आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही त्यांना दाखवणार. या विरोधात हे चारच विद्यार्थी आक्रमक झाल्यानं विद्यापीठ परिसरामध्ये तुफान राडा झाला. यानंतर भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. पोलिसांनी मोठ्या कसरतीनं सगळं आंदोलन आता मिटविलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी सगळ्यांना ताब्यात घेतलं आहे.
भाजपा व डाव्या विचार संघटनेचा आक्रोश : भाजपा कार्यकर्ते आणि डाव्या विचार संघटनेचे कार्यकर्ते यामधला राडा इतका तुफान होता की, भाजपा कार्यकर्त्याने आम्हाला पोलीस संरक्षणामध्ये मारहाण केली. परंतु, पोलिसांनी काहीच केलं नाही. अर्थात हे भाजपाच्या बाजूचं सरकार असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे. यामध्ये दोन विद्यार्थिनी आणि दोन दलित विद्यार्थ्यांना सुरक्षा देताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाविरुद्ध हे आंदोलन करण्यात आलं आहे. प्रशासन नेमकं काय करतं? अशा प्रकारचे गैरप्रकार विद्यापीठाच्या वसतिगृहात होत असतील तर जबाबदार लोकांवर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेली आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस यांच्या विषयी आम्हाला शंका आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असताना अशा गोष्टी कशा घडतात यावर कारवाई का करत नाही. मोर्चा कोणी काढला या सगळ्याची चौकशी करा. देशाचा अभिमान असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी लिहिणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपाने केली.
दोन्ही गटांकडून एकमेकांवर केस : दोनच दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दोन संघटनांमध्ये मोठा राडा झाला होता. सभासद नोंदणी वरून डाव्या विचाराच्या आणि उजव्या विचाराच्या संघटनांमध्ये हा राडा झालेला दिसत होता. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर केससुद्धा झालेल्या होत्या आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं होतं. त्यानंतर काल संध्याकाळी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आक्षेपार्ह लिखाण भिंतीवर करण्यात आलं. काल त्याचा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. त्यानंतर आता भाजपा पुण्यात आक्रमक झाली असून भाजपा शहराध्यक्ष आणि पुण्यातील शहर भाजपा त्याचबरोबर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक आंदोलन करत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि प्रधान नरेंद्र मोदी याविषयी केलेल्या लिखाणाचा निषेध म्हणून भाजपाकडून हे आंदोलन करण्यात आलयं.
हेही वाचा: