पुणे - देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जो बॉम्ब फोडला आहे, तो तर पहिला होता. जरा धीर धरा असे आणखी बरेच बॉम्ब तुमच्यावर येणार आहेत. तुम्ही पहिल्याच बॉम्बला चिडीचूप होते आहात, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवाय यावेळी त्यांनी शरद पवारांच्या टीकेलाही प्रतिउत्तर देत असे समजा देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय यंत्रणा वापरल्या, पण ते वापरुन का होईना? पण शूटींग केल ते खरंय ना? तुम्ही त्यावर बोला, अशा त्यांनी पवारांवर टीकाही केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवारी) सकाळीच नोटीस देणे हे चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. आम्ही नोटीस दिली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांनी दिली आहे. त्यांनी तुम्हाला नोटीस दिली म्हणून तुम्ही नोटीस दिली आहे, असं सांगतच राज्य सरकारचा तपास यंत्रणा आणि न्यायालयावर विश्वास नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
'आम्ही सरकार पाडणार नाही'
आम्ही सरकार पाडणार असे म्हटले नाही. फडणवीस असे म्हणाले की अब बारी मुंबई की है! ती शिवसेनेविरोधात नाही, तर ती लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. ती आम्ही जिंकणार आणि निवडणूका पुढे ढकलून आजचे मरण सरकारने उद्यावर ढकलल आहे, असे सांगतच मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येणार, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - Notice to Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसची भाजपकडून होळी