दौंड (पुणे) - दौंड तहसील कार्यालयावर वंचित पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफिचा लाभ मिळावा या मागणीसाठी भाजप पुणे जिल्हा किसान मोर्चाच्या वतिने ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले.
![bjp kisan morcha agitation for benefit of loan waiver announced by the government to flood affected farmers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-daund-bjp-movement-av-10059_05102020184710_0510f_1601903830_338.jpg)
यावेळी भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणिस माऊली शेळके, ग्रामविकास आघाडी सहसंघटक गणेश आखाडे,कानगांव विकास संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश गवळी, दत्तात्रय फडके, गणपत नलवडे, नानासो सरडे, नानासो गवळी, भाऊसाहेब कोह्राळे,रोहीदास रोडे, राजेंद्र मोरे, सुनिल महाडीक, बाळासाहेब चव्हाण, नवनाथ कोह्राळे यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
![bjp kisan morcha agitation for benefit of loan waiver announced by the government to flood affected farmers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-daund-bjp-movement-av-10059_05102020184710_0510f_1601903830_221.jpg)