पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या विरोधात भाजपा आक्रमक झाली असून पुण्यामध्ये अजित पावरांच्या विरोधात आंदोलन (BJP protest against Ajit Pawar) करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ब्राह्मण महसंघाकडून संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आलं आहे.
अजित पवारांचे वक्तव्य : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते असे अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द पहिली तर मोघलांच्या विरोधात औरंगजेबच्या विरोधात लढण्यात त्यांचं खूप वेळ गेला.या देशाचं आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. हा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे.त्या काळात औरंगजेबने एवढे अत्याचार केले अस असताना लाचार होऊन मतांसाठी अजित पवार यांनी जे कृत्य केल आहे ते निंदनीय असून त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी.अशी मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
संभाजी महाराजांना अभिवादन : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सेनापती शिव प्रभुचे वारस छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते.स्वराज्य आणि स्वधर्म यासाठी बलिदान केलेला हा हिंदू छावा असून त्यांच धर्मवीर पद नाकारण हा त्यांचाच नव्हे तर समस्त हिंदूंचा शिव प्रभुचा अपमान आहे.अस म्हणत हिंदू महासभेच्या वतीने डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात आलं आहे.