ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये वापरलेले पीपीई किट अन इंजेक्शन रस्त्यावर, रुग्णालयाकडून नकार - पिंपरी-चिंचवड खासगी रुग्णालय बातमी

पिंपरी-चिंचवड शहरात खासगी रुग्णालयाकडून पदपथावर जैववैद्यकीय कचरा टाकला जात असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मात्र, रुग्णालयलय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

जैववैद्यकीय कचरा
जैववैद्यकीय कचरा
author img

By

Published : Sep 24, 2020, 4:45 PM IST

Updated : Sep 24, 2020, 5:37 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात खासगी रुग्णालयातील कर्मचारी वापरलेले पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, इंजेक्शन आणि मास्क टाकत सार्वजनिक रस्त्यावर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खासगी रुग्णालय संत तुकाराम रुग्णालयाच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेर मोहम्मद मुजावर यांनी तक्रार दिली आहे.

पदपथावर पडलेला जैववैद्यकीय कचरा
दरम्यान, याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप खोडून काढले असून आमचे कर्मचारी रस्त्यावर कोविडसंबंधी मेडिकल कचरा टाकत नसल्याचे 'ईटीव्ही' शी बोलताना डॉ. प्रकाश गलांडे यांनी म्हटले आहे.पिंपरी-चिंचवडसह देहूरोड परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मात्र, हे सर्व होत असताना दुसरीकडे रुग्णालयाचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो, असा प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथील संत तुकाराम रुग्णालयाचे कर्मचारी सार्वजनिक रस्त्याच्या पथपदावर पीपीई किट, इंजेक्शन, मास्क, हॅन्ड ग्लोज आणि कोविड रुग्ण जेवण करत असलेल्या प्लेट टाकत असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार शेर मोहम्मद मुजावर यांनी समोर आणला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खुलासा करताना संत तुकाराम रुग्णालयाचे डॉ. प्रकाश म्हणाले, रस्त्याच्याबाजूला कोविडसंबंधी जैववैद्यकीय कचरा टाकला जात नाही, असा कचरा आम्ही टाकणार नाहीत. गेल्या सहा वर्षांपासून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत आहोत. काही जण रुग्णालयाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - 'आयटी हब' हिंजवडीत 25 किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

Last Updated : Sep 24, 2020, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.