ETV Bharat / state

Kasba Assembly By Election : कसबा निवडणूक कशी लढवायची भाजपचे ठरले; चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारीबाबत मोठे संकेत

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी आज सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मोठे संकेत देत उमेदवारी कोणाला मिळणार याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. निवडणूक कशी लढवायची यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kasba Assembly By Elections
मंत्री चंद्रकांत पाटील पत्रपरिषदेत बोलताना
author img

By

Published : Jan 23, 2023, 7:11 PM IST

मंत्री चंद्रकांत पाटील पत्रपरिषदेत बोलताना

पुणे: आमच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही तयारीला लागलो आहोत, कसब्यातील कार्यालयातून पुढील बैठका होतील. गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक होईल. तीन समित्या केल्या आहेत. ज्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या 25 वर्षांपासून नेतृत्व केलेले खासदार गिरीश बापट हे पुन्हा मतदार संघात सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष राहिलेले आहे. तर आता खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्याने गिरीश बापट ज्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकतील त्याला तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. परंतु या पोटनिवडणुकीत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये शैलेश टिळक त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

निवडणुकीची तयारी ही आधीपासूनच : हे मतदार संघ जरी परंपरागत आमचेच असले तरी निवडणुकीची तयारी ही आधीपासूनच करावी, अशी आमच्या पक्षाची रणनीती आहे. त्यामुळे आजची बैठक घेतली मतांचे मार्जिन कसे वाढेल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. कसबा पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजीव सातव गेल्यानंतर आम्ही बिनविरोध दिली. हा दाखला महाविकास आघाडी का देत नाही? इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवली जातात. नंतर दिल्लीतून घोषणा होईल. विकास आघाडीच्या महानेत्याने आधीच निवडणुकीबाबत चर्चा सुरू केल्याने आम्ही तयारी सुरू केली आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांचा सुद्धा समाचार घेतला आहे. कसबा पोटनिवडणुकीबाबत आमचा सर्वे चालू आहे. तर २५ तारखेला चिंचवड विधानसभेबाबत बैठक होईल.

संजय राऊतांचा घेतला समाचार : आम्ही घरातला देणार नाही असे कोणी सांगितले? तुम्ही टिळकांच्या घरातीलच उमेदवार देणार असा अर्थ काढायचा का? या प्रश्नाला उत्तर देताना आमच्याकडे दिल्लीतून नावे ठरतात, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे. संजय राऊत जेलमध्ये होते. त्यानंतर चार दिवस शांत होते. पण आता बोलायला लागले. संजय राऊत बोलायचे तेव्हा सगळ्यांना उत्सुकता होती. पण आता ते कुठून बोलतात हे तुमच्याकडून कळते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरमधील केलेल्या वक्तव्याचा समाचार सुद्धा यावेळी घेतला आहे.

आम्ही बाळासाहेबांचे ऋणी : आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कसबा विधानसभाच्या निवडणुकीची सुरुवात झाल्याचे मी सांगत आहे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. राजकारणात आणि समाजकारणात महाराष्ट्र ते कधी विसरणार नाही. आम्ही सगळे त्यांचे ऋणी आहोत असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा अभिवादन केले.

बैठकीला या मान्यवरांची उपस्थिती : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील 'देवाशिष' निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी खासदार संजय काकडे, आमदार भीमराव तापकीर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्यासह गणेश बीडकर, हेमंत रासने, धीरज घाटे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांमधले सर्वजण कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये शैलेश टिळक कुणाल टिळक गणेश बिडकर हेमंत रासने धीरज घाटे यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा: Shiv Sena-VBA Alliance : महाराष्ट्रात सध्या वैचारिक प्रदूषण, लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र; उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची युतीची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.