ETV Bharat / state

प्रेयसी व्हिडिओ कॉलिंगवर इतरांशी बोलते म्हणून गळा आवळून खून; प्रियकराला अटक - प्रियकराने केला प्रेयसीचा खून

प्रेयसीने लग्नाला दिलेला नकार आणि इतरांशी व्हॉटसअ‌ॅपवर आणि व्हिडिओ कॉलिंगवर बोलणे सहन न झाल्याने महेश खंडागळे याने तिचा खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Bhosari Police Station
भोसरी पोलीस ठाणे
author img

By

Published : May 21, 2020, 7:43 AM IST

पुणे- प्रेयसी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलणे आणि व्हॉट्सअ‌ॅपवर नेहमी इतरांशी चॅटिंग करत असल्याचा राग मनात धरून खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी प्रियकर महेश मल्हारी खंडागळे (२८) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कासारवाडी परिसरात घडली असून विवाहित प्रेयसीला एक मुलगा देखील आहे.

२२ वर्षीय प्रेयसी आणि महेश हे दोघे एकत्र राहात होते. प्रेयसीचे लग्न झालेल होत हे माहीत असताना महेश तिला स्वीकारत होता. ते दोघे लग्न करणार होते. प्रेयसीच्या आईची आणि मुलाची संमती होती. यामुळेच ते दोघे ही एकत्र राहात होते. गेल्या काही दिवसांपासून महेश हा प्रेयसीकडे लग्नाचा आग्रह करत होता. मात्र, तिने कालांतराने नकार द्याला सुरुवात केली. महेश यामुळे हा तिच्यावर संशय घ्यायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेयसी व्हिडिओ कॉलिंगद्वारे आणि व्हॉट्सअ‌ॅपवर इतरांशी बोलायची. हे सर्व महेशला पटत नव्हते. लग्नास दिलेला नकार आणि इतरांशी चॅटिंग यामुळे दारूच्या नशेत असलेल्या महेशने त्याच्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. अगोदर त्याने ही आत्महत्या असल्याचे भासवले. मात्र, भोसरी पोलिसांनी खाक्या दाखवताच महेशने गुन्हा कबुल केला. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.