ETV Bharat / state

पर्यटकांसह ट्रेकर्सनी फुलला भीमाशंकर नाणेघाट - Bhimashankar Naneghat crowd of trekkers with tourists

यंदा पावसाळ्यात ट्रेक बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांना या निसर्गाचा अनुभव घेता आला नाही. मात्र दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सगळे पर्यटक आता या ठिकाणी मुक्कामी येऊन त्याचा आनंद घेत आहेत.

appeal to protect nature
गड किल्यांवर ट्रेकर्सची गर्दी
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:33 PM IST

जुन्नर (पुणे) - सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते नाणेघाट परिसरात असलेल्या किल्ल्यांवर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. राज्यातला एकमेव पर्यटन तालुका, कृषी पर्यटन तालुका अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व भीमाशंकर परिसरातील बोलका निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत असतो. लॉकडाऊननंतर पर्यटक, ट्रेकर या परिसरात आनंद घेत आहेत. मात्र पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात येऊन निसर्गाला जपण्याचे आवाहन पक्षी अभ्यासक सुभाष कुचिक, ट्रेकर व कृषी पर्यटन अभ्यासक नीलेश खोकराळे यांनी केले आहे.

भिमाशंकर नाणेघाट पर्यटकांसह ट्रेकर्सनी फुलला

जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरातील जीवधन किल्ला पर्यटकांना सुट्ट्यांमध्ये खुणावत असतो. या ठिकाणी ट्रेकिंग आणि रॅपलिंगसाठी उंचच उंच डोंगर रांगा आहेत. यासोबतच पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सगळ्यात जुना राजमार्ग याच घाटातून जातो. यामुळे पर्यटक या ठिकाणी पावसाळ्यात मोठी गर्दी करतात. यंदा पावसाळ्यात ट्रेक बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांना या निसर्गाचा अनुभव घेता आला नाही. मात्र दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सगळे पर्यटक आता या ठिकाणी मुक्कामी येऊन त्याचा आनंद घेत आहेत.

हेही पाहा- मी पुन्हा येईन, पुन्हा गाईन : अमृता फडणवीसांचा नवा निर्धार

पर्यटक व ट्रेकर हा शिस्तबद्ध व रोल मॉडेल करणार वनविभागाचे संकल्प....

लॉकडाऊननंतर शासनाने नियम व अटींवर पर्यटन खुले करण्यात आले आहे. पर्यटकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले असून जुन्नर व भीमाशंकर परिसरात वन कर्मचारी पर्यटक व ट्रेकला मार्गदर्शन करून मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. जुन्नर व भीमाशंकर परिसरात येणार पर्यटक व ट्रेकर हा शिस्तबद्ध व रोल मॉडेल म्हणून ओळखला जावा व पुढील काळात निसर्गाच्या सौंदर्याला जपण्यासाठी कशी काळजी घ्यावी यासाठी वनविभागाने विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे वनपाल रमेश खरमाळे यांनी सांगितले.

हेही पाहा- अवघ्या तीन तासाचे शिक्षणमंत्री! पदभार स्वीकारल्यानंतर काहीवेळातच दिला राजीनामा

पर्यटनस्थळी स्वच्छतेची काळजी घ्या...

पुणे मुंबई परिसरातून सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करणारे ग्रुप मोठ्या संख्येने गडकिल्ल्यांवर भटकंतीला आले आहेत. कोरोनानंतर आपल्या आरोग्याची काळजी घेत या ट्रेकर्सने भटकंती सुरू केली आहे. ट्रेकिंग करत असताना निसर्गाच्या सौंदर्याला जपण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेतली जाते. तर काही ठिकाणीं स्वच्छतेची मोहीम राबवण्याचा छंद अनेक वर्षांपासून भटकंती ग्रुप करत आहेत. पर्यटक व ट्रेकर्स यांनी निसर्गाच्या सान्निध्यात येत असताना प्लास्टिक, नाशवंत पदार्थ मोकळ्या ठिकाणी टाकू नयेत. कारण याच वस्तू जंगलातील वन्यजीव खाद्य म्हणून खातात, त्यामुंळे वनजीवांच्या जीवाला धोका होतो. त्यामुळे पर्यटकांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन भटकंती ग्रुपचे सदस्य नीलेश धानापुणे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.