ETV Bharat / state

Bhimashankar Jyotirling Pune : भीमाशंकर पश्चिम घाटातील कैलास!

Bhimashankar Jyotirling Pune : पश्चिम घाटातील कैलास म्हणून भीमाशंकरची ओळख आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जागृत देवस्थान आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी आहे. तिचे उगमस्थान भीमाशंकर हे आहे. ( The source of the river Bhima )

author img

By

Published : Mar 1, 2022, 12:42 PM IST

Bhimashankar Jyotirling Pune
भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे

पुणे - पश्चिम घाटातील कैलास म्हणून भीमाशंकरची ( Bhimashankar Jyotirling Pune ) ओळख आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जागृत देवस्थान आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी आहे. तिचे उगमस्थान भीमाशंकर हे आहे. ( The source of the river Bhima )

श्री भीमाशंकर
यं डाकिनिशानिकासमाजे निषेव्यमाणं पिशिताशनैश्व ।
सदैव भीमादिपद प्रसिद्ध तं शडकरं भक्तहितं नमामि ।।
ॐ भीमशंकर नमः

Bhimashankar Jyotirling Pune
भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे

भीमाशंकरची अख्यायिका -

शिवपुरणामध्ये भीमाशंकरची कथा आहे. भीमाशंकर बद्दलची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, कुंभकर्णाचा मुलगा भीम होता. आपल्या वडिलांच्या वधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो उन्मत्त झाला होता आणि सर्वांवरती अत्याचार करू लागला होता. यावेळी सर्व देवी देवता भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी भीमाच्या अत्याचारांपासून सुटका करावी म्हणून विनवणी केली. यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी भीमासोबत युद्ध करून त्याचा वध केला. ज्या ठिकाणी त्याचा वध झाला त्या ठिकाणी भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थापले गेले. या ज्योतिर्लिंगला भीमाशंकर ज्योतिर्लिंग असे नाव प्राप्त झाले. भीमाशंकर येथे मूळ ज्योतिर्लिंग हे गुप्त भीमाशंकर येथे आहे. येथेच भीमानदीचे मूळ उगम स्थान आहे आणि ज्योतिर्लिंगातुन ती उगम पावते. ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. अशी अख्यायिका आहे.

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी -

भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत.
सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. पेशवेकाळात चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. चिमाजी आप्पा निस्सीम शिव भक्त होते. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. एकाचवेळी निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुरेख मिलाफ या ठिकाणी बघायला मिळतो. शंकराच्या जटाच जणू जंगलाच्या रूपाने येथे वाढताहेत. भीमाशंकराच्या ओढीने श्रद्धाळू येथे येतातच पण निसर्गप्रेमीही येथे येतात. पावसाळ्यात या भागाला भेट देणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेली शेकरू ही खार या जंगलात आढळते. विशेष म्हणजे येथे आढणाऱ्या खारीला भीमाशंकरी खार असेही म्हटले जाते.

भीमा नदीचे उगम स्थान -

महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संप्रदायाला पूज्य असलेली चंद्रभागा नदी ही मूळची भीमा नदी होय. येथे ती भीमा नावानेच उगम पावते. पुढे पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते.

हेही वाचा - Trimbakeshwar Temple In Nashik १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर; सलग 39 तास राहणार खुले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.