ETV Bharat / state

बावडा खून प्रकरणातील फरार आरोपी ताब्यात - Bawada murder case accused arrested news

इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडलेल्या खून प्रकरणातील फरारी असलेल्या दोघांना पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (दि.१५) अकलुज येथून ताब्यात घेतले.

Bawada murder case : Fugitive 2 accused arrested
बावडा खून प्रकरणातील फरार आरोपी ताब्यात
author img

By

Published : Jun 16, 2021, 7:00 PM IST

बारामती - इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडलेल्या खून प्रकरणातील फरारी असलेल्या दोघांना पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (दि.१५) अकलुज येथून ताब्यात घेतले. १७ जानेवारी रोजी संजय महादेव गोरवे याचा संगनमताने खून करून त्याचे हात, पाय आणि डोके कापून भीमा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणात याआधीच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र दोन जण फरार होते.

काय आहे प्रकरण

बावडा येथे १७ जानेवारी रोजी दादा कांबळे याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून मंजुषा महादेव गोरवे (वय ५१ वर्षे रा. टाकळी टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर) यांचा मुलगा संजय महादेव गोरवे यास त्याचे मित्र लकी विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्या मध्यस्थीने बोलावून घेतले. यावेळी कुटुंबातील सरूबाई, सुष्मिता व काजल यांच्याशी संजय याची जवळीक संबध असलेचा संशय घेऊन, बावडा गणेशवाडी गावच्या हद्दीत संजय यास धारधार हत्याराने जीवे मारले. त्याचे दोन्ही हात,पाय व डोके कापून अज्ञात ठिकाणी फेकून दिले. तर धड भिमा नदीच्या पात्रात ओळख पटू नये याकरीता फेकून दिला होते. अशी फिर्याद मंजुषा गोरवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी ३ आरोपी अटक करण्यात आलेले होते. गुन्ह्यातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.

खबर मिळाली अन् कारवाई केली

याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली होती. मंगळवारी (दि. १५) एलसीबी पथकास या गुन्ह्यातील फरार दोघे आरोपी हे अकलूज (जि.सोलापूर) येथे येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरून पोलिसांनी अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात (वय २० वर्षे), प्रमोद प्रताप खरात (वय २१ वर्षे दोघे रा. माळशिरस ता. माळशिरस जि.सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई -

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसनिरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, गुरु गायकवाड, अभिजित एकशिंगे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.