बारामती - श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झाला. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे, ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे. ती पाकिस्तानमध्ये देखील उदभवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे, याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते, की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही, पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील - देशातील, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी श्रीलंकेतील परिस्थितीवर भाष्य केलं. श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत: मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.
एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ओरिजीनल शिवसेना (shivsena) असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे यांचे कान टोचले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काय केले होते, याचं उदाहरण दिले आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळे चिन्ह घेतले. त्यांचं चिन्हं आम्ही मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी बारामतीत मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सल्ला दिला.
हेही वाचा - MP Chirag Paswan Demands President Rule : बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लावा, खासदार चिराग पासवान यांची मागणी