पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदाही बकरी ईद ही साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली होती. यानंतर पुणे शहरातील विविध भागात बुधवारी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे मशीद बंद असल्याने घरीच नमाज पठण करून बकरी ईद साजरी केली.
ईद-उल-जुहा म्हणजे त्यागाची ईद मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा असेही संबोधले जातात. ईद-उल-जुहा चे पर्व हिजरीच्या अंतिम महिन्यात झिलहीज मध्ये साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव मक्का मध्ये एकत्र येऊन हज साजरी करतात .ईद-उल-जुहा याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-जुहा ला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू मिठाई देतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालन पोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे.
एकमेकांना दिल्या शुभेच्छा का साजरी करतात बकरी ईदइस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबर पैकी एक असलेले हजरत इब्राहिम यांच्यामुळे कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली.अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वात प्रिय वस्तु कुर्बान करण्यास सांगितले. इब्राहीम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता.अल्लाचा आदेश मानून ते त्यांचा मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले. इब्राहिमने आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी त्याला घेऊन निघाले. कुर्बानी देण्याच्या वेळेस डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या मुलाची कुर्बानी देत होते. जेव्हा कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्या मुलाऐवजी एका बकऱ्याची कुर्बानी दिली गेली. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद साजरी केली जाते.
साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद हे साध्या पद्धतीने साजरी करण्यात येते आहे. यंदाही घरीच नमाज अदा करून उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी सर्वप्रथम नमाज अदा करून त्यानंतर कुर्बानी दिली जाते. एकमेकांना ईद मिलन करून त्यानंतर घरात गोड पदार्थ साजरी करतात.
कोरोनाचे संकट दूर व्हावे शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली बकरी ईद सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन याव तसेच राज्यावर तसेच देशावर आणि जगावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावा अशीदेखील प्रार्थना यावेळी करण्यात आली.