पुणे Bageshwar Baba Controversial Statement : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे सध्या पुण्यात व्याख्यान सुरू आहे. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांचे लाखो फॉलोवर्स आहेत. परंतु आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं ते नेहमीच चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी संत तुकारामांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यावरुन त्यांच्यावर विविध क्षेत्रातून टीका करण्यात आली, अन् अखेर बागेश्वर बाबांना आपल्या विधानाबद्दल माफी मागावी लागली. दरम्यान, यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात व्याख्यानावेळी महाराष्ट्राच्या संतांचं वर्णन करताना बागेश्वर बाबांचं वेगळीच माहिती दिली.
काय म्हणाले बागेश्वर बाबा : पुण्यात व्याख्यानावेळी बोलत असताना बागेश्वर बाबा म्हणाले की, देहू नगरी ही संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. हे सबंध महाराष्ट्रासह देशभरात जगाला सुद्धा माहिती आहे, असं ते म्हणाले. पुढं "देहू नगरीचा उल्लेख करून या ठिकाणी संत नामदेवाचं मंदिर आहे" बागेश्वर बाबा म्हणालेत. त्यामुळं आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
नवीन वादाला सुरुवात होणार? : याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपाचे नेते जगदीश मुळीक यांनी पुण्यात बागेश्वर बाबांच्या तीन दिवसीय सत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भाजपाचे जेष्ठ नेता आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावून बागेश्वर बाबांना विरोध करणाऱ्यांना सुनावलं. त्यानंतर मात्र बागेश्वर बाबांनी व्याख्यान करताना समोरील भाविकांना सत्संग सांगताना महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर आळंदी इथं राहिले. त्याच जिल्ह्यामध्ये देहू इथं नामदेवांचं मंदिर असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळं नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
संत तुकारामांबाबत केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते संत तुकारामांबद्दल बोलताना म्हणाले होते की, 'त्यांची (संत तुकारामांची) पत्नी त्यांना रोज मारत होती.' पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावरुन विविध राजकीय पक्षांकडून सातत्यानं निषेध करण्यात येत होता. त्यानंतर बागेश्वर बाबांना याबाबत माफी मागावी लागली.
हेही वाचा -
- बागेश्वर महाराजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, अंनिसच्या प्रश्नावर म्हणाले, हनुमानजींच्या नावावर चमत्कार झाला तर रोखू शकत नाही
- धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला पुण्यात विरोध; अजित पवार गट, अंनिस मैदानात
- Bageshwar Dham In Thane: बागेश्वर बाबा चौथ्यांदा ठाणे जिल्ह्यात; अंबरनाथमध्ये रामकथा आणि हनुमान कथेचे आयोजन