पुणे : काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेखाली भाजपचे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी नेते मंडळी यांना सक्त सूचना दिल्या आहे की, येत्या 26 तारखेपर्यंत काम सोडून प्रचाराला लागा अस सांगितले आहे. यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ही टोळधार पुण्यात आली आहे. आत्तापर्यंत आयकर विभाग, ईडी, सीबीआय याचा वापर करत होते. पण हे आत्ता पोलीस अधिकारी, जीएसटी अधिकारी, यांच्या बैठका घेऊन सर्वांना कामाला लावण्यात आले आहे. साम, दाम, दंड, भेद वापरण्याचा प्रयत्न करतील पण पुण्याचे लोक हे चालू देणार नाही असे यावेळी लोंढे म्हणाले आहेत.
स्वतःच्या प्रभागाच्या देखील विकास त्यांनी केला नाही : कसबा मतदारसंघातील निवडणूक 1985 नंतर काँग्रेसने जिंकलेली नाही पण आता जो उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो उमेदवार पाहता कसबा मतदार संघातील जनता यंदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करणार आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे किती अकार्यक्षम आहेत. त्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती अधिकार होते तेव्हा त्यांनी मी किती अकार्यक्षम आहे. याचा दाखला त्यांनी दिला आहे. पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना देखील शहर सोडा पण स्वतःच्या प्रभागाच्या देखील विकास देखील त्यांनी केला नाही. अशी टीका देखील यावेळी लोंढे यांनी केली आहे. तसेच, रासने यांनी 500 कोटी आणून देखील जर ते म्हणत असतील की विकास झाला नाही. तर, याची सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी लोंढे यांनी केली आहे.
मग चोरून लपून का शपथविधी केला : एमपीएससी बाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन देखील आयोग निर्णय घेत नाही. आणि त्या विरोधात उद्या काँग्रेस पक्षाकडून एमपीएससीच्या मुलांबरोबर आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे देखील यावेळी लोंढे यांनी सांगितल. पहाटेच्या शपथविधी बाबत फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत लोंढे यांना विचारले असता, ते म्हणाले की जर तुम्ही सत्य होते आणि तुमची बोलणी झाली होती तर मग चोरून लपून का शपथविधी केला. दिवसा ढवळ्या सत्याची साथ घेत का तुम्ही शपथ घेतली नाही. रात्रीचे काम हे सगळे लपून छपूनच होतात. असेही यावेळी लोंढे म्हणाले आहेत.
आता विलीनीकरण का होत नाही : एसटी कामगारांच्या पगार बाबत लोंढे यांना विचारलं असता ते म्हणाले, की पूर्वी विलीनीकरणच्या आंदोलनात काही लोक डिस्को डान्स करत होते. डंके की चोट पे म्हणत एक जो रॅम्प साँग आला होता. ते आत्ता कुठे आहे. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे आत्ता कुठे आहे. सहानुभूीपूर्वक विचार करून जर एखादा अजून आंदोलन करत असेल तर त्याचा विचार हा विकास आघाडीने केला आहे. पण आता विलीनीकरण का होत नाही. असा देखील सवाल यावेळी लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा : Jitendra Awhad: सहाय्यक आयुक्त मारहाण प्रकरण! जितेंद्र आव्हाड समर्थकांना अटक