पुणे - मुंबई आणि पुणे परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना राजगुरुनगर परिसरात रेड झोन व कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी बाहेर पडुन प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी देखील पुणे मुंबईच्या रेड झोन भागातून नागरिक रात्रीच्या सुमारास आडमार्गाने पोलीस बंदोबस्त चुकवून आता खेड तालुक्यातील विविध गावात मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुणे मुंबई परिसरातून येणाऱ्या नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करुन स्वत: ला क्वारंटाईन करून घ्यावे व घराबाहेर पडु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी दिला आहे
चाकण राजगुरूनगर हा भाग पुण्याच्या अगदी जवळ असल्याने अनेक कामगार, शासकीय कर्मचारी कामानिमित्त अजुनही प्रवास करत आहेत. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व कामगारांनी शक्य असल्यास कामाच्या ठिकाणीच आपल्या वास्तव्याची व्यवस्था करावी, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल, असेही आवाहन तहसिलदार सुचित्रा आमले यांनी केलं आहे.
हेही वाचा - राजगुरूनगर बफर झोन, राक्षेवाडी कंटेन्मेंट झोन; नागरिकांनी बाहेर न पडण्याचे पोलिसांचे आवाहन
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमधून आणखी ५०० परप्रांतीय मूळ राज्यात रवाना.. महाराष्ट्र पोलीस जिंदाबादचा केला जयघोष