पुणे - कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाची केलेली तोडफोड निषेधार्थ असून या संदर्भात पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले असल्याचे माजी मंत्री आनंतराव थोपटे यांनी सांगितले.
संबंधित प्रकार कार्यकर्त्यांच्या नाराजीतून घडल्याचे ते म्हणाले. परंतु, हे का झालं याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालण्याची गरज असून मंत्रीपदांच्या वाटपात ज्येष्ठतेचे निकष पाळले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
संपूर्ण प्रकरणात ज्येष्ठतेचे निकष डावलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोण-किती वेळ आमदार झाले आहे, याचा विचार व्हायला हवा त्यांनी म्हटले.