ETV Bharat / state

Amit Shah on Ajit Pawar : अमित शाहांकडून अजित पवारांचे कौतुक; म्हणाले, आता योग्य ठिकाणी...

author img

By

Published : Aug 6, 2023, 7:12 AM IST

Updated : Aug 6, 2023, 3:07 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. आजच्या त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. शाह यांनी पुण्यातील केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले.कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचे कौतुक केले. तर अजित पवार आता योग्य जागेवर बसले असल्याची प्रतिक्रिया अमित शाह यांनी यावेळी दिली. तसेच शाह यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.

Amit Shah Pune Visit
अमित शाह
अमित शाह यांचे पुण्यात भाषण

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे 5 ऑगस्ट रोजी पुणे विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार हे युती सरकारमध्ये सहभागी झाले. यासर्व घटनाक्रमानंतर पहिल्यांदाच अमित शाह हे महाराष्ट्रात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी फुटीनंतर शाह काय बोलणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती.

अजित पवार योग्य ठिकाणी आले - अजित पवार पहिल्यांदाच योग्य जागेवर बसले आहेत. मी अजित पवार पहिल्यांदाच एका मंचावर बसलो आहोत. अजित पवार हे उशिरा का होईना, योग्य ठिकाणी आले आहेत. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. सीआरसीएसचे संपूर्ण काम आता पूर्णपणे डिजीटल होणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

शाह यांनी सहकार क्षेत्राला प्रोत्साहन दिले - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. शाह यांनी सहकार क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. ८० हजार कोटींची राज्यात कामे सुरू आहेत. करमाफीमुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. मोदी व शाह यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती सुरू असल्याचे अर्थमंत्री यांनी म्हटले आहे.

सहकार क्षेत्रात अमित शाहांचे योगदान - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सहकार प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे. सहकारातून समृद्धी येऊ शकते हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. अमित शाह हे कणखर गृहमंत्री आहेत. अमित शाह यांची महाराष्ट्र ही जन्मभूमी तर भारत ही कर्मभूमी आहे. त्यांचा जन्म मुंबईतील आहे. अनेक वर्ष अनेकांना जमू शकले नाही, ते शाह यांनी केले. साखर कारखान्यांची थकबाकी कमी करण्यासाठी अमित शाह यांनी प्रयत्न केले. त्यांनी सहकारी चळवळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शाह यांनी महाराष्ट्रात साखर कारखाना सुरू केला होता, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.

सहकार क्षेत्रात क्रांतीकारक निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न आहे. शाह यांनी सहकार क्षेत्रात क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत. अमित शाह यांच्यामुळे सहकार क्षेत्रातला गैरव्यव्हार थांबला आहे. कारखान्यांचा १० हजार कोटींचा कर माफ करण्याचा त्यांनी निर्णय घेत साखर उद्योगाला मोठी मदत केली आहे. मोदींच्या नेतृत्वात शाह यांनी हिंमत दाखवित ३७० कलम हटविले आहे.

  • सहकारिता क्षेत्र को सुदृढ़ बनाने के लिए इसके पूरे तंत्र का कम्प्यूटरीकरण आवश्यक है। पुणे (महाराष्ट्र) में सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोआपरेटिव सोसाइटी (CRCS) कार्यालय के डिजिटल पोर्टल के शुभारंभ कार्यक्रम से लाइव... https://t.co/ehWTjqsoqH

    — Amit Shah (@AmitShah) August 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा? - अमित शाह यांचा हा दौरा शासकीय असला तरी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले असताना शाह यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हिरवा कंदील मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सहकारी क्षेत्रात व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन - देशातील सहकार चळवळीला चालना देण्यासाठी सहकार मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून डिजिटल पोर्टल तयार करण्यात आले आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या संकल्पनेशी सुसंगत आहे. केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या संगणकीकरणाचा उद्देश सहकारी क्षेत्रात व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देणे आणि विविध प्रक्रिया सुव्यवस्थित करणे हे आहे.

हेही वाचा :

  1. Amit Shah News:आरएसएसचे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अमित शाह यांनी घेतले अंत्यदर्शन
  2. Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर
  3. Amit Shah maharashtra Tour : 'अमित शाहांना प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वचा परिचय व्हावा म्हणून पुस्तक भेट दिले'

Last Updated : Aug 6, 2023, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.