पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्या नंतर त्यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदारांनी देखील बंड पुकारत शिंदे गटात सहभागी झाले. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) हे देखील शिंदे गटात सामिल झाले आहेत. यावर शिवसेनेचे नेते व विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल मत मांडलं आहे. पुण्यातील सर्किट हाऊस येथे अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. (Ambadas Danve press conference).
काय म्हणाले दानवे - अंबादास दानवे म्हणाले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलेच आपली भूमिका ही स्पष्ठ केली आहे. ज्यांच्या मनात पाप आहे त्यांना थांबवून काय फायदा. आम्ही जर प्रयत्न केला असता तर ज्यांनी बंड केलं आहे त्यातील 50 ते 60 टक्के आमदारांना आम्ही थांबवू शकलो असतो. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या यांचे पती शिंदे गटात जाणार आहेत यावर दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, शिंदे गट खालच्या स्तरावरील राजकारण करत आहे. दसरा मेळाव्याला पण ठाकरे यांच्या कुटूंबातील व्यक्तींना घेतलं. आज त्यांचं काय झालं. तसंच आज सुषमा अंधारे ह्या ज्याप्रमाणे हल्ला बोल करत आहेत ते शिंदे गटाच्या जिव्हारी लागत आहे. त्यामुळे आज त्यांच्या पतींना प्रवेश दिला आहे.
कीर्तिकर यांनी अचानक निर्णय घेतला - गजानन किर्तीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत दानवे म्हणाले की कीर्तिकर यांनी अचानक निर्णय घेतला आहे. ते जेष्ठ नेते आहे. त्यांच्यावर आक्षेप नाही पण पक्षांनी त्यांना सर्व दिलं. पण तरीही त्यांनी पक्ष सोडला. पक्षात सन्मान दिला जात नाही असा आरोप हा खोटा आहे.
त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची चर्चा - भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यावर दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की आदित्य ठाकरे राहुल गांधी एकत्र आले हे अनेकांच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे ते ट्रोल होत आहेत. भारताला जोडण्यासाठी राहुल गांधी करत असतील तर ते चांगलं आहे. युवा शक्ती एकत्र आली तर येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील. मध्यावधी निवडणुका बाबत दानवे यांना विचारल असता ते म्हणाले की असविधांनात्मक पद्धतीने सरकार आलं आहे. 16 आमदार बद्दल याचिका कोर्टात आहे. असे असल्याने सरकार कसं चालेल. तसेच काही नाराज आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणूक चर्चा सुरू आहेत, अस देखील यावेळी दानवे म्हणाले.
आजचा सामना वाचा - शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक केलं आहे. यावर दानवे यांना विचारल असता ते म्हणाले की, एखादया माणसाचं कौतुक करणं म्हणजे अस नाही की ते नरमले. आजचा सामना वाचा. भाजप आणि केंद्र याबद्दल काय मांडले येणाऱ्या काळात कळेल. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे, अस दानवे यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, चित्रा वाघ यांची भूमिका बदलली आहे. त्यांनी माघार घेतली आहे. महिलांविषयी काम करताना राजकारण करतात हे समोर आलं आहे. एखादा विषय उचलला तर शेवटपर्यंत घेऊन जायला पाहिजे.