पुणे : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडीत जोरदार प्रचार सुरु असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, ऐनवेळी अक्षय गोडसे यांनी यू-टर्न घेत हेमंत रासने यांना पाठिंबा दिल्याचे जाहिर केले आहे.
अक्षय गोडसेंनी घेतला यू-टर्न : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण तर, कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच महोत्सव प्रमुख म्हणुन अक्षय गोडसे काम पाहत आहेत. त्यांनी आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याने गणेश मंडळात चर्चा सुरू झाल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या स्थापनेत गोडसे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून अक्षयच्या मदतीने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नंतर हेमंत रासणे यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत, रवींद्र धंगेकर यांनी मी पाठिंबा जाहिल केलेला नाही असे, अक्षय गोडसेने व्हिडीओ बनवत सांगितले.
आगोदर धंगेकरांना पाठिंबा : रवींद्र धंगेकर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये अक्षयने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि माझ्या कुटुंबाशी अनेक वर्षांपासूनचे घनिष्ट नाते आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माझे आजोबा तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून ते अशोक गोडसे आणि माझ्यापर्यंत त्यांचे अतिशय स्नेहाचे नाते आहे. तात्यासाहेब यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त धंगेकर त्यांच्या प्रभागात भगवद्गीतेची सुमारे एक हजार पुस्तके वाटप करायचे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे आणि माझे प्रेमाचे नाते आहे. आमच्या कुटूंबातर्फे त्यांना पाठिंबा देत असल्याचा व्हिडिओ अक्षय गोडसेंनी बनवला होता.
दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार : पुण्यातील कसबा, चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी, भाजपने जोरदार तयारी केली आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष प्रचार सभा, बाईक रॅली, पदयात्रा यावर भर देत आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासणे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे.
हेही वाचा - MLC Seats Row : विधान परिषदेतील बारा आमदारांचा घोळ सुटेना; शिंदे, फडणवीस यांच्यात मतभेद?