ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

author img

By

Published : May 8, 2021, 3:01 PM IST

विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. तसेच तहसिलदार विजय पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत वाटप करण्यात आलेले अन्नधान्य व यापुढील नियोजनाची माहिती दिली.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण
रुग्णवाहिकेचे लोकार्पण

बारामती - कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, लसीकरणाचे योग्य ते नियोजन करावे तसेच त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे, आवाहन उपमुख्यमंञी अजित पवार यांनी बारामतीत केले. येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. तसेच तहसिलदार विजय पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत वाटप करण्यात आलेले अन्नधान्य व यापुढील नियोजनाची माहिती दिली. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नातू फांऊडेशन, पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि केमिकल कंपनी (डिमेक) एमआयडीसी, बारामती यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग यांच्या कार्यालयातील नविन वाहनांचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व राज्य उत्पादक शुल्क दौंडचे निरिक्षक विजय मनाळे व नातू फांऊडेशनच्या प्रभा नातू व ‘डिमेके’चे नागेश कोरे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.