पुणे - शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी 23 कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली. तसेच विविध मोर्चामध्ये ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत, ते परत घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
उपस्थितांची गर्दी पाहून खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद, वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्त्व विभाग यांच्या माध्यमातून किल्ले शिवनेरी परिसराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.