ETV Bharat / state

Ajit Pawar : सत्ता नेहमी बदलत असते, विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये - अजित पवार

author img

By

Published : Nov 19, 2022, 8:36 PM IST

नवीन कामे सुरु करण्याबाबत आमचे दुमत नाही. परंतु मागील विकासाची कामे थांबवण्याचेही काही कारण नाही. सत्ता नेहमी बदलत असते.त्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी कायम आपणच सत्तेत राहणार नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये, असे आवाहन राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी केले.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे (बारामती) : सध्याच्या सरकारने महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामांना स्थगिती दिली आहे. उड्डाणपूल, पूल व अन्य कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. वास्तविक या कामांना विधीमंडळ सभागृहाची मंजूरी मिळाली आहे. अशी कामे थांबवणे उचित नाही, हे मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक भेटीत सांगत आलो आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये - पुढे बोलताना पवार म्हणाले, त्यांनी नवीन कामे सुरु करण्याबाबत आमचे दुमत नाही. परंतु मागील विकासाची कामे थांबवण्याचेही काही कारण नाही. सत्ता नेहमी बदलत असते.त्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी कायम आपणच सत्तेत राहणार नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणे टाळले - मला सावरकरांच्या विषयी काहीही बोलायचे नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले की, राजकीय नेतेगण, मिडियाने कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे हे ठरवले पाहिजे. राज्यात अनेक भीषण प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. अतिवृष्टीने शेतकरी हवालदील झाला आहे. त्याला पिकविम्याचे पैसे, शासनाकडून मिळणे गरजेचे झाले आहे. हे सगळे सोडून अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, व्यक्तिचा उल्लेख करून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये, असे माझे मत आहे.

अधिवेशनाचे मुद्दे इतक्यात सांगणार नाही - राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु व्हायला अजून अवकाश आहे. इतक्या लवकर मी अधिवेशनातील मुद्दे सांगू इच्छित नाही. मी सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेणार आहे. त्यात चर्चा करून मुद्दे ठरवले जातील. आत्ताच मुद्दे सांगितले तर बैठकीचे प्रयोजन काय? असा प्रश्न ते मला विचारतील, असे सांगत पवार यांनी अधिवेशनातील मुद्दे सांगण्यास नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.