ETV Bharat / state

Ajit Pawar on Nirmala Sitharaman निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबाबत अजित पवारांचे भाष्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, Union Finance Minister Nirmala Sitharaman चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule बारामतीत आले तरी, त्यांचेही स्वागतच आहे. अशी, प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Sep 2, 2022, 8:38 AM IST

Updated : Sep 2, 2022, 9:51 AM IST

बारामती - बारामतीत कोणीही येऊ द्या त्यांचे आम्ही स्वागतच करू. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघतोय अनेक जण येतात भेटतात, जातात. बारामतीत पंतप्रधान आले त्यांचेही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, Union Finance Minister Nirmala Sitharaman चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे. बारामतीकरांना भेटावे. मात्र, बारामतीकर त्यांना जे हव आहे तेच करतात अशी, प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.

पाच पैशाचाही मिंदा नाही - बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काहींना केवळ टेंडर काढण्यातच रस असतो. शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत. असा आरोप केला होता. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या बारामतीत जी विकास कामे चालू आहेत. ते टेंडर काढण्यात रस आहे म्हणून चालली आहेत काय? बाहेरच्या व्यक्तीने येऊन उचलली जीभ लावली टाळ्याला. हा जरी त्यांचा अधिकार असला तरी, त्याला किती महत्त्व द्यायचं हा बारामतीकरांचा अधिकार आहे. मी ज्या दिवसापासून बारामतीचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही कामाच्या टेंडरमध्ये पाच पैशाचाही मिंदा नाही.

आम्ही एकमेकांचे वैरी नाहीत - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अनेक नेते मंत्री भेटत आहेत. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, आपण अनेकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो ही आपली भारतीय संस्कृती आहे. यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. उलट आनंद आहे. मी आणि राज ठाकरे अनेकदा भेटलो आहोत. राजकीय मतभेद असले तरी, आम्ही एकमेकांचे वैरी नाहीत. मित्रत्वाचे संबंधही असू शकतात. शिवसेनेच्या गटबाजीमुळे दसरा मेळाव्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका सर्वजण खंबीर आहेत. जो तो आपापल्या पक्षाचा विचार करत असतो.

हेही वाचा - Amit Shah Mumbai Visit केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनाला मुंबईत, राजकीय चर्चासुद्धा होणारं - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Sep 2, 2022, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.