ETV Bharat / state

पुणे शहरावर पसरली धुक्याची चादर, गुलाबी थंडीची चाहूल...

आज पहाटे पुणेकरांनी धुक्याचा अनुभव घेतला असून हे यावर्षीच्या हंगामातील पहिलेच धुके आहे.

पुणे शहरावर धुक्याची चादर
author img

By

Published : Nov 7, 2019, 11:55 AM IST

पुणे - मागील काही दिवसांपासून अवेळी पडणारा पाऊस आणि दुपारच्या वेळी पडणाऱ्या प्रखर सूर्यकिरणांनी पुणेकर त्रस्त झाले होते. आज पहाटे पुणेकरांनी धुक्याचा अनुभव घेतला असून हे यावर्षीच्या हंगामातील पहिलेच धुके आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात सकाळी, दुपारी कडक ऊन तर सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस पडत होता. काही मिनिटेच पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचून वाहतुकीची कोंडी व्हायची. त्यामुळे या अवेळी येणाऱ्या पावसामुळे पुणेकर अगदी त्रस्त झाले होते.

आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. शहरातील अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.

पुणे शहराच्या आसपास अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्वती, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई यासारख्या टेकड्यांवर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना आज धुके पाहायला मिळाले. हे धुके इतके दाट होते की, काही अंतरावरचे दृश्य दिसत नव्हते. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी आज धोक्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.

Intro:पुणे शहरावर धुक्याची चादर
मागील काही दिवसांपासून अवेळी पडणारा पाऊस आणि दुपारच्या वेळी प्रखर सूर्यकिरणांनी त्रस्त झालेल्या पुणेकरांनी आज पहाटे धुक्याचा अनुभव घेतला.. यावर्षीच्या हंगामातील हे पहिलेच धुके. धुके पडायला लागले याचा अर्थ पावसाळा संपला असाही घेतला जातो..

मागील काही दिवसांपासून शहरात सकाळी, दुपारी कडक ऊन तर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशत ढगांची गर्दी होऊन जोरदार पाऊस होत होता. काही मिनिटेच पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडायची. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचून वाहतुकीची कोंडी व्हायची. त्यामुळे या अवेळी येणाऱ्या पावसामुळे पुणेकर अगदी त्रस्त झाले होते. Body:ऑक्टोबर महिना संपला तरी पाऊस सुरूच त्या थंडीची चाहूल ही नाही असे चित्र मागील काही दिवसांपासून होते. मात्र असे असताना आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना एक वेगळेच दृश्य दिसले. शहरातील अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली.
Conclusion:पुणे शहराच्या आसपास अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्वती, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई यासारख्या टेकड्यांवर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना आज हे धुके पाहायला मिळाले. हे धुके इतके दाट होते की काही अंतरावर चे ही दिसत नव्हते. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी आज धोक्याचा मनमुराद आनंद लुटला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.