ETV Bharat / state

Sharad Pawar: तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार ठेवणार काँग्रेस भवनमध्ये पाऊल

Sharad Pawar: शरद पवार यांनी 1999मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवार यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये कधीच पाऊल ठेवले नव्हते. आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिन आहे.(Pune Congress Bhavan) यानिमित्त शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी केली होती.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Dec 31, 2022, 1:27 PM IST

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) स्थापन झाल्यापासून सातत्याने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या मदतीला तसेच स्वतःच्या मतभेद विसरून दुसऱ्याला मदत करतानाचे चित्र पाहायला मिळतात. (Pune Congress Bhavan) आत्ता अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे तब्बल 24 वर्षानंतर पुण्यातील काँग्रेसभवनमध्ये (Pune Congress Bhavan) पाऊल ठेवणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिन: शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये कधीच पाऊल ठेवले नव्हते. आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिन आहे. यानिमित्त शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या, अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी केली होती. त्याचाच मान ठेवत शरद पवार आज 7 वाजता काँग्रेस भवनमध्ये भेट देत काँग्रेस कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणार आहेत.

काँग्रेसभवन मध्ये पाय ठेवला नव्हता: सोनिया गांधींच्या विदेशी असण्यावर आक्षेप घेणारं पत्रही पवारांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीची एक महत्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना 6 वर्षासाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांच्या साथीने 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी कधीच काँग्रेसभवन मध्ये पाय ठेवला नव्हता.

काँग्रेस भवनमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास: शरद पवार यांची राजकीय कारकिर्द ही काँग्रेस पक्षापासूनच सुरु झाली. काँग्रेसचे एक दिग्गज नेते म्हणून शरद पवार यांची ओळख होती. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी विविध पद भूषवली. चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले. तसेच काँग्रेसमध्ये असतानाच केंद्रात विविध मंत्रीपदावर देखील शरद पवार यांनी काम केलं. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर म्हणजे जवपास 24 वर्षानंतर शरद पवार हे प्रथम पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत. पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा आत्तापर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. एक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामाध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वाटचालीची माहिती देण्यात आली आहे. या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसकडून देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात आहे. त्याचप्रमाणं पुण्यातही कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.