पुणे - पुणेकर स्वतःही विनोद करतात, त्यांना विनोद कळतो. त्यामुळे माझे 'आफ्टरनून लाईफ' संदर्भातील विधान ते विनोदानेच घेतील, अशी अपेक्षा पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याआधी आफ्टरनून लाईफ सुरू करावी लागेल, असे वक्तव्य केले होते. यावर खुलासा करताना ठाकरे म्हणाले, पुण्यात मी अनेक वर्षांपासून येतो, त्यामुळे पुणेकर स्वतः विनोद करतात आणि त्यांना विनोद कळतो. त्यामुळे माझे ते विधान पुणेकर विनोदानेच घेतील.
हेही वाचा - राणीच्या बागेत सुरू होणार प्राण्यांचे प्रजनन केंद्र - आदित्य ठाकरे
प्लास्टिक वापर बंदीबाबत पुण्याने आजवर चांगली भूमिका बजावली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण असे काही बोलले असतील तर माझ्या ऐकिवात नाही, ऐकून त्यावर प्रतिक्रिया देईन"