बारामती (पुणे) - इंदापूर येथे लॉकडाऊन उठताच जनावरांच्या कत्तलखान्यावर बारामती गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत १४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, तब्बल १७ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या सुचनेवरून बारामती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना जनावरांची कत्तल करून त्याची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी रात्री बारामती गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सदर कारवाईत ३ पिकअप, ३ टेम्पोसह ९८ जिवंत गोवंश जनावरे, ३ देशी गाई, १ जर्शी बैल, १ म्हैस अशी एकूण १०३ गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली. शिवाय सदर ठिकाणी ३ हजार ३०० किलोचे कापलेले मांस आढळून आले. एकूण १४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
प्रकरणी कलीम कयूम कुरेशी, वाहिद शब्बीर कुरेशी, आस्कंन नयुम कुरेशी, रशीद बेपारी, जमीर बेपारी, कासम कुरेशी, जमीर कुरेशी, समीर शबरी सौदागर यांच्यासह वाहन चालक आणि मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.