दौंड (पुणे) - तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यातील सुमारे तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली. रमेश दगडू शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याला बावडा-अकलूज रोड येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
फरारी आरोपी शोधण्यासाठी मोहिम -
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे असलेले आणि फरारी असलेले आरोपी पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. यानुसार यवत पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद असलेला आरोपी रमेश दगडू शिंदे याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून शोध सुरू होता. हा आरोपी गेले तीन वर्षांपासून फरार होता. तो बावडा अकलूज रोड येथे येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. यानुसार याठिकाणी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - नो मराठी नो अॅमेझॉन...! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अॅमेझॉन विरुद्ध आता खळ्ळ-खट्याक
या आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन त्यास यवत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे,
पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड,गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले यांनी केली.