ETV Bharat / state

चित्रपटातल्या सारखा चित्तथरारक अपघात; घोडा आणि मालक दोघे जखमी - accident

घोडागाडीचे घोडे अचानक बिथरल्यामुळे सैरावरा धावायला लागले. गाडी थांबवण्याच्या नादात गाडीमालक आणि घोडा हे दोघेही जखमी झाले आहेत.

pune
घोेडागाडीला थांबवण्याचा प्रयत्न करताना गाडीमालक
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:54 AM IST

Updated : Dec 7, 2019, 1:26 PM IST

पुणे - कोरेगाव पार्क परिसरातील वाटसरुंनी काल चित्तथरारक अपघात अनुभवला. घोडागाडीचे घोडे बिथरुन रस्त्यावर सुसाट वेगाने धावत होते. या गाडीला अडवण्याचा प्रयत्न घोडागाडीचा मालक करत होता. या प्रयत्नात घोडा आणि मालक दोघेही जखमी झाले. या प्रसंगाचे चित्रीकरण घटनास्थळावरुन केले गेले. हा थरार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.

अपघाताचा व्हीडिओ

पुण्यातल्या कोरेगाव पार्कातील कल्याणी नगर भागात एक घोडागाडी जात होती. त्या परिसरातील एका लग्नात मिरवणुकीसाठी ती वापरली जाणार होती. विद्युत रोषणाई केलेल्या या गाडीत कुणीही चालक बसलेला नव्हता. अचानक गाडीचे घोडे बिथरले आणि सुसाट धावू लागले. भररस्त्यात धावणारे घोडे कुण्या गाडीला धडकून अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे गाडीमालक मोटारसायकलवर स्वार होऊन घोड्यांना थांबवण्यासाठी निघाला.

हेही वाचा - महिलेला पोलिसांचा धक्कादायक सल्ला; ‘तो’ पुन्हा तुमच्याकडे आल्यावर बोलवा! मग कारवाई करू

घोडागाडीचा पाठलाग करत मोटारसायकलने गाडी गाठली. मागे बसलेल्या मालकाने घोड्याच्या वेसणीला हात घालून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो थांबला आहे असे वाटताच अडखळून खाली कोसळला. या बरोबरच मालक सुद्धा मोटारसायकलवरुन खाली कोसळला आणि घोडागाडीच्या चाकाखाली आला. गाडीची दोन्ही चाके मालकाच्या अंगावरुन गेली. पुढे काही अंतरावर जाऊन घोडे थांबले. पण, यात घोडा आणि मालक दोघेही जखमी झाले आहेत.

Intro:पुण्यात घोडा बग्गी अपघाताचा थरार ...Body:mh_pun_01_horse_trolly_accident_av_7201348

anchor
पुण्यातल्या कोरेगावपार्क भागात शोभा यात्रा लग्न मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या घोडा बग्गीचा घोडा बिथरल्याने थरारक अपघाताची घटना घडली...शुक्रवारी रात्री येरवडा परिसरात हा अपघात झाला यात बग्गीचा घोडा आणि बग्गी मालक जखमी झाले....कोरेगाव पार्क परिसरात कल्याणी नगर भागात शुक्रवारी रात्री लाईटने सजवलेली एक घोडा बग्गी कार्यक्रमासाठी नेण्यात येत होती घोडा बग्गी रस्त्यावरून जात असताना घोडे भिथरले आणि वेगात धावू लागले त्यामुळे घोड्याना काबूत आणण्यासाठी बग्गीचा मालक दुचाकीवरून घोड्याना पकडण्याचा प्रयत्न करत होता मात्र बग्गीचा वेग वाढल्याने घोड्याना थांबताना अचानक घोडा कोसळला तसेच दुचाकी वरील बग्गी मालक ही कोसळला ही बग्गी मालकाच्या अंगावरून गेली त्यामुळे एक जण यात जखमी झाला आणि घोडा ही जखमी झाला...दरम्यान रस्त्यावरून वाहतूक ही सुरू असल्याने काही काळ भीतीचे वातावरण होते मात्र घोडा कोसळल्याने पुढील अनर्थ टळला हा सर्व थरार एक चालकाने मोबाईल चित्रित केल्याने तो चांगलाच व्हायरल झाला आहे...

Conclusion:
Last Updated : Dec 7, 2019, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.