पुणे - वर्चस्ववादातून झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून आठ जणांच्या टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार केले. त्याशिवाय हातातील कोयते फिरवून परिसरात दहशत परविली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. ही घटना फुरसुंगीतील भेकराईनगरमध्ये घडली. याप्रकरणी रोहित इंगळे (वय २०, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दहशत पसरविली
फिर्यादी रोहित आणि टोळक्यातील एकाची वर्चस्वाच्या वादातून भांडणे झाली होती. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपीने रोहितला भेकराईनरमधील एटीएमसेंटमरध्ये गाठले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हातातील कोयते फिरवून आम्ही कोणालाही जिवंत सोडणार नाही, असे ओरडून दहशत पसरविली. त्यामुळे घाबरून दुकानदारांनी आपआपली दुकाने बंद केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.