पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये 68 वर्षीय नराधमाने दहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी विरोधात पीडित मुलीच्या आईची फिर्याद -
याप्रकरणी 68 वर्षीय सावन या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
चॉकलेटचे आमिष दाखवून अश्लील चाळे -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या दहा वर्षीय मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर मुलीला आडबाजूला झाडामध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच, मुलीला मारण्याचीही धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित घटना पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर उघड झाली याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटनांवर आळा बसला पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा - बाळासाहेबांच्या स्मारक भूमिपूजनावरून वाद; राज ठाकरेंसह विरोधीपक्षनेत्यांनाही निमंत्रण नाही
हेही वाचा - पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड