दौंड : अरविंद ज्ञानेश्वर देवकर वय 46 असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. एक शिक्षकी प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या शाळेत नुकताच प्रवेश घेतला होता. शिक्षकाने 3 ऑगस्ट राजी वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार सुरु होते. यातच आज त्यांचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला.
दोन महिण्यापुर्विच देवकर हे जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते. आल्यानंतर त्यांनी शाळेची दुरावस्था पाहुन विद्यार्थ्यांच्या मदतीने साफ सफाई केली. मात्र वर्गातील मुलांनी ही बाब. घरी जाऊन आई वडिलांना सांगितले तेव्हा पालकांनी नंतर शाळा गाठत या प्रकारा बद्दल त्यांना जाब विचारला होता. तसेच यावेळी 10 पैकी 9 मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची नावे त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत टाकले होते.
सदर शिक्षकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. यात त्यांनी या आधी 19 वर्षात कोठे किती काम केले. तेथिल काम किती चांगले राहिले या उल्लेखा सोबतच असे म्हणले आहे की, शाळेत विद्यार्थ्यांना सोबत घेत कचरा साफ केल्याचे पालकांना खटकले. पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवले. मी पालकांना एक संधी मागितली होती पण मी त्यांचा विश्वास संपादन करु शकलो नाही. मी पालक वर्गाची माफी मागितली होती पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे माझ्या मनात अपराधी पणाची भावणा माझ्या मनात रुजली आहे.
माझ्याकडुन समाजाचे नुकसान झाले आहे. त्या मुळे या पवित्र मंदिरातच मी या देहाचा त्याग करत आहे अशा आशयाची एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केल त्यांच्यावर सुरवातूला उरुळी कांचन येथे आणि त्या नंतर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र दाखल केल्या नंतर 5 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.