पुणे - पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुण्यात कोरोनाने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. अशात पुण्यातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या 72 वर्षी बायमा तांबोळी या भवानी पेठेतील होप रुग्णालयातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना 9 तारखेच्या पहाटे घडली आहे. 9 तारखेपासून अजूनही तांबोळी दांपत्याला आपली आई मिळालेली नाही. हॉस्पिटल प्रशासनाला देखील तांबोळी हे कुठे गेल्या? काय झाल? या बाबत माहिती मिळत नाही आहे.
हेही वाचा - पुण्यात देशातील पहिले चाईल्ड कोविड केअर सेंटर सुरू करणार - महापौर मुरलीधर मोहोळ
आजू बाजूला मृत्यू पाहून मनात भीतीचे वातावरण
बायमा तांबोळी या पुण्यातील गुरुवार पेठ येथे राहत असून त्यांना 3 मे रोजी कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर त्यांना तेथील स्थानिक बोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बोरा रुग्णालयात कोरोना रुग्णांचे होत असलेले मृत्यू पाहून बायमा यांच्या मनात भीती बसली आणि त्यांनी आपल्या मुलांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठी सांगितले. लगेच 8 मे च्या दुपारी समीर तांबोळी यांनी आपल्या आईला भवानी पेठ येथील होप रुग्णालयात दाखल केले. मात्र, बोरा रुग्णालयात बसलेली भीती बायमा तांबोळी यांची काही कमी होत नव्हती आणि 9 तारखेच्या पहाटे बायमा तांबोळी गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली.
जबाबदार कोण?
बायमा तांबोळी या रुग्णालयातून गायब झाल्यानंतर त्या कुठे गेल्या? का गेल्या? कशा पद्धतीने रुग्णालयातून बाहेर गेल्या? हे त्या रुग्णालय प्रशासनालाही माहीत नाही. पोलीस याबाबत तपास करत आहे, मात्र सर्व काही व्यवस्थित असताना अशा पद्धतीने एखाद्या रुग्णालयातून रुग्ण गायब होणे धक्कादायक बाब आहे. याला जबाबदार कोण? रुग्णाची मानसिकता की रुग्णालय व्यवस्था, हा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
जशी माझी आई सोडली होती, तशी आणून द्या
हॉस्पिटलमध्ये आम्ही आमच्या आईला जशी सोडली होती, तशीच्या तशी हॉस्पिटलने ती आणून द्यावी. हॉस्पिटलमधून गायब झाल्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क देखीक साधला नाही. आईला शोधण्यासाठी हॉस्पिटल, मंदीर, मशीद, दरगाहा येथे देखील जाऊन आलो. काही ठिकाणी तर 6 ते 7 वेळा जाऊन आलो, पण आई सापडली नाही. आमची आई आम्हला लवकरात लवकर सापडावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
हेही वाचा - बारामतीत लॉकडाऊन वाढला; आज मध्यरात्रीपासून १८ मे पर्यंत बंद