ETV Bharat / state

पुण्यातील कोरोनाग्रस्तांची प्रकृती चांगली, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क - म्हैसेकर - corona pune news

पुण्यामध्ये आढळलेल्या ५ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. संशयित रुग्णांचे नमूने निरीक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.

दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त
दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त
author img

By

Published : Mar 11, 2020, 7:36 PM IST

पुणे - पुण्यामध्ये आढळलेल्या ५ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातल्या नायडू रुग्णालयात एकूण १७ रुग्ण निरीक्षणाखाली असून यातल्या ५ जणांना कोरोणाची बाधा झाली आहे. तर, इतर १२ रुग्णांना संशयित म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्या सर्व रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

संशयित रुग्णांचे सॅम्पल निरीक्षणासाठी पाठवणयात आले असून त्याचा रिपोर्ट बुधवारी सायंकाळपर्यंत हाती येणार आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांबाबत काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. त्यांच्याकडून जो निर्णय घेईल तो पाळला जाईल. मात्र, अद्याप शाळा किंवा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय झालेला नाही. पुढील परिस्थिती पाहून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे देखील विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात कोण-कोण आले आहे, याचा कंटेंट प्लॅन सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने २८ ऍक्शन पॉईंटप्रमाणे जिल्ह्याभरात काम सुरू केले असल्याचे देखील विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. दर ४ तासांनी केवळ साबणाने हात धुतला तरी चालणार असून कमीत कमी वीस सेकंद हात धुतले पाहिजे. तसेच कोरोना व्हायरस हा थुंकीच्या थेंबाद्वारे पसरत असल्याने त्याच्याशी संपर्क आल्याशिवाय कोरोनाची लागण होत नाही. त्यामुळे कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर नाक, डोळे, तोंडाला स्पर्श करू नका या नियमांचे पालन नागरिकांनी करावे असे विभागीय आयुक्त यावेळी म्हणाले.

हेही वाचा - पुणे : भामचंद्र डोंगरावर कोणाताही विकास करु नये, ग्रामस्थांची मागणी

रुग्णांची ओळख उघड करू नये त्यामुळे समाजमाध्यमांतून अफवा पसरण्याची भीती असते, याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी. चुकीची माहिती, अफवा पसरवणाऱ्यावर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. अशी चुकीची गोष्ट आढळल्यास प्रशासन कारवाई करेल, असे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये सोबतच पुणे परिसरातील १८ खाजगी रुग्णालयांना देखील जिल्हा प्रशासनाकडून सज्ज करण्यात आले आहे. याठिकाणी २०० खाटा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - कोरोना प्रभाव : 'त्या' कर्मचाऱ्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्या, आयटी कर्मचाऱ्यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.