ETV Bharat / state

राज्यातील दिग्गजांचा समावेश असलेले एकूण 44 कारखाने रेड झोनमध्ये; इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तांकडून यादी जाहीर - sugar factory black list maharashtra

गेल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत काम करत असताना असे लक्षात आले आहे की, साखर कारखानदाऱ्यांची परिस्थिती कशी आहे? सर्वसामान्य सभासदांना ते सभासद असतानाही ते कळत नाही. बऱ्याच वेळा खोटे आश्वासन देऊन एफआरपीपेक्षा जास्त पैसे देऊ, असे सांगून लोकांना आमिष दाखवले जाते. प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसते. त्याचे परिणाम म्हणून काही कारखाने सुरुवातीला ५ टक्के मग १० टक्के पैसे देतात. मात्र, हंगाम संपला तरीही त्यांना फक्त ४० टक्केच पैसे दिलेले असतात.

Sugar Commissionerate
साखर आयुक्तालय
author img

By

Published : Sep 28, 2021, 6:43 PM IST

Updated : Sep 28, 2021, 7:13 PM IST

पुणे - इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तालयाकडून अशी यादी काढण्यात आली आहे. राज्यातील एकूण 44 कारखाने हे रेड झोनमध्ये म्हणजे एफआरपी वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित केले आहे. एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याना घालताना ही यादी लक्षात घेऊन ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असे आवाहनही केले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक पुढाऱ्यांच्या करखान्यांचाही यामध्ये समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, समाधान औताडे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे.

याबाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड

शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून यादी काढली -

गेल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत काम करत असताना असे लक्षात आले आहे की, साखर कारखानदाऱ्यांची परिस्थिती कशी आहे? सर्वसामान्य सभासदांना ते सभासद असतानाही ते कळत नाही. बऱ्याच वेळा खोटे आश्वासन देऊन एफआरपीपेक्षा जास्त पैसे देऊ, असे सांगून लोकांना आमिष दाखवले जाते. प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसते. त्याचे परिणाम म्हणून काही कारखाने सुरुवातीला ५ टक्के मग १० टक्के पैसे देतात. मात्र, हंगाम संपला तरीही त्यांना फक्त ४० टक्केच पैसे दिलेले असतात. ज्या शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी ऊस लावला आहे त्याला जर अशा पद्धतीने पैसे मिळणार असतील तर हे बरोबर नाही. म्हणून आम्ही चांगले कारखाने कोणते आणि वाईट कारखाने कोणते? हे शेतकऱ्यांसमोर आणले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. म्हणूनच यादी काढण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Jalyukt Shivar : तत्कालीन फडणवीस सरकारच्या 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू

मे अखेरीस एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही -

मी राज्यातील शेतकऱ्यांना हे लक्षात आणून दिले आहे की, कोणत्या कारखान्याने मागच्या वर्षी एफआरपी ३१ डिसेंबरला दिली आहे. ३१ मार्चपर्यंत कोणी दिली आहे आणि ऑगस्ट अखेरीस कोणी दिलेले नाही, हे स्पष्ट करून देण्यात आले आहे. यामागील उद्दिष्ट असा की, गळीत हंगामात शेतकरी फसू नये. त्याने एकमेकांना माहिती दिली पाहिजे. यंदा राज्यात ८० हजार टनाने कारखान्यांची क्षमता वाढली आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये. मे अखेरीस एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही. याचीही हमी आम्ही देत आहोत. ऊस जास्त आहे म्हणून काही टोळ्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. त्यासाठी देखील आम्ही परिपत्रक काढले असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील रेड यादीतील कारखाने -

  1. श्री दत्त इंडिया प्रा. ली. सांगली
  2. यशवंत शुगर खानापूर सांगली
  3. एम. जी. झेड शुगर तासगाव सांगली
  4. किसनविर साखर कारखाना सातारा
  5. खंडाळा तालुका कारखाना सातारा
  6. गुरू साखर कारखाना कोरेगाव सातारा
  7. स्वराज इंडिया फलटण सातारा
  8. ग्रीन पवार खटाव सातारा
  9. नीरा भीमा इंदापूर पुणे
  10. राजगड भोर पुणे
  11. सिध्येश्वर उत्तर सोलापूर
  12. संत दामाजी सोलापूर
  13. श्री विठ्ठल पंढरपूर सोलापूर
  14. मकाई करमाळा, सोलापूर
  15. संत कुर्मदास माढा सोलापूर
  16. लोकमंगल ॲग्रो उत्तर सोलापूर
  17. लोकमंगल शुगर दक्षिण सोलापूर
  18. सिद्धनाथ शुगर उत्तर सोलापूर
  19. गोकुळ शुगर दक्षिण सोलापूर
  20. मातोश्री लक्ष्मी अक्कलकोट सोलापूर
  21. जय हिंद शुगर दक्षिण सोलापूर
  22. विठ्ठल शुगर करमाळा सोलापूर
  23. गोकुळ माऊली शुगर अक्कलकोट सोलापूर
  24. भीमा साखर मोहोळ सोलापूर
  25. सहकार शिरोमणी वसंतराव काळे पंढरपूर सोलापूर
  26. लोकमंगल माऊली उस्मानाबाद
  27. भाऊसाहेब बिराजदार उस्मानाबाद
  28. बानगंगा उस्मानाबाद
  29. डी. डी. एन. उस्मानाबाद
  30. पियुष शुगर अहमदनगर
  31. एस जे शुगर मालेगाव नाशिक
  32. सातपुडा शुगर नंदुरबार
  33. शरद साखर कारखाना पैठण औरंगाबाद
  34. घृष्णेश्‍वर शुगर औरंगाबाद
  35. संघननाथराव जालना
  36. समृद्धी शुगर जालना
  37. जयभावानी बीड
  38. वैद्यनाथ परळी बीड
  39. टोकाई हिंगोली
  40. सुभाष शुगर नांदेड
  41. सिद्धी शुगर लातूर
  42. साईबाबा शुगर लातूर
  43. पन्नगेश्वर शुगर लातूर
  44. श्री सातपुडा तापी परिसर ससाका लि. पुरुषोत्तमनगर ता. शहादा

Last Updated : Sep 28, 2021, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.