ETV Bharat / state

पुणे विभागातील 40 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; तर 53 नव्या रुग्णांची भर - press conference corona update

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 210, सांगली जिल्ह्यात मध्ये 26, सातारा जिल्ह्यामध्ये 6 तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 कोरोना बाधित रुग्ण सध्या आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

covid 19 patient discharge
पुणे विभागातील 40 कोरोनाबाधीतांना डिस्चार्ज; तर 53 नव्या रुग्णांची भर
author img

By

Published : Apr 9, 2020, 11:30 PM IST

पुणे - विभागातील 40 कोरोनाबाधित रुग्ण गुरुवारी (9 एप्रिल) बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तर 53 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील एकूण रुग्ण संख्या 246 झाली आहे. तसेच 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त पुणे

पुणे विभागातील गेल्या 24 तासांमधील मृतांची आकडेवारी आणि तपशील -

पुणे महानगरपालीका क्षेत्रात 6 तर बारामतीमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सह्याद्री रुग्णालयात 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, ससून रुग्णालयात पुण्यातील 63 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. 60 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्ये बारामतीमधील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नोबल रुग्णालयात पुण्यातील 62 वर्षीय कोरोनाबाधीत पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 210, सांगली जिल्ह्यात मध्ये 26, सातारा जिल्ह्या मध्ये 6 तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 कोरोना बाधित रुग्ण सध्या आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.