पुणे - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर तेच दुसरीकडे रुग्ण बरेदेखील होत आहेत. येथे सोमवारी 255 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 212 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच 8 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 518 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 12 हजार 686 वर पोहोचली आहे. 280 रुग्ण गंभीर आहेत. यातील 55 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 7 हजार 672 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 4 हजार 496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - आता मुख्य लक्ष्य मृत्यूदर कमी करण्याकडे - डॉ. शशांक जोशी
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चालली आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.