पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयात (Youth suicide MIT Collage) 20 ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता एका २१ वर्षीय युवकाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले (Student Commits Suicide at MIT) आहे. जॉर्डन पब्लिसीयेस (वय २१ रा. मूळ बेंगळुरु, कर्नाटक) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. (latest news from Pune ) (Pune Crime)
जॉर्डन होता तणावात- जॉर्डन पब्लिसीयेस हा विद्यार्थी एमआयटी शैक्षणिक संकुलातील डिझाईन कॉलेजमध्ये चौथ्या वर्षाला शिक्षण घेत होता. मागील दोन दिवसापासून जॉर्डन हा तणावामध्ये होता. दरम्यान, एमआयटीतील सुरक्षा रक्षकांना काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जॉर्डनने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. मात्र जॉर्डन याने आत्महत्या का केली आहे, याचे कारण अद्याप समजू शकलेली नाही.
जॉर्डनला विदेशात जाण्याची मिळाली होती संधी- जॉर्डन पब्लिसीयेस हा अतिशीय हुशार विद्यार्थी पहिला क्रमांक पटकावणारा एक्सीलेंट विद्यार्थी अशी त्याची ओळख होती. गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याला एब्रॉडला जाण्यासाठी संधी देखील प्राप्त झाली होती. दिवाळी निमिर्ती सगळे विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. जॉर्डन पब्लिसीयेस याची 5 वाजता ट्रेनची कंफॉर्म तिकीट होती. सगळे विद्यार्थी आपल्या आपल्या गावी जात आहे म्हणून नेहेमी प्रमाणे एमआयटी मधले वॉर्डन सगळ्या रूम ची तपासणी करत होत्या, मात्र जॉर्डन याची रूम बंद होती खूप वेळा दरवाजा वाजल्या नंतर ही रूम मधून कोणी आवाज देत नाही म्हणून खिडकीतून पहिल्या नंतर बघितली की धक्का बसला. जॉर्डनने आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आत्महत्येमागे लव मॅटर- पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्या रूम पाटनरची चौकशी केली असता तो म्हणाला की जॉर्डन हा दोन दिवस तणावामध्ये होता. अशी माहिती पार्टनरने दिली. त्याचा रूम पार्टनर गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्याच्या गावी निघून गेला होता. मात्र पोलिसानी त्याचा मोबाईल तपास केला असताना, त्याचे एक तरुणी सोबत संबंध होते. घटनेच्या दिवशी तरुणीसोबत 2 तासांपूर्वी म्हणजे दुपारी २;३०च्या सुमारास जॉर्डन तरुणी सोबत ४० मिनटी फोनवर बातचीत करत होता. मात्र त्यानंतर तरुणीने त्याला सलग 5 वाजेपर्यंत फोन केलेत. त्याच्या व्हाट्सअप तपास केल्यानंतर मेसेज आहेत की, ''जॉर्डन - तू मला आयुष्यभर साथ देशील का ? तरुणी - नाही ...जॉर्डन :- तू आता एकटीच राहशील.'' असे मॅसेज त्याच्या व्हॉट्सॲप वर होते. पुढील तपास पोलीस करत आहे.